छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेवारस सोन्याची बिस्किटे जप्त

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दिनांक 3 मार्च रोजी एतिहाद विमानाची झडती घेतली आणि 4 मार्च रोजी कोणाचाही दावा नसलेली सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.

जप्त केलेल्या वस्तूंमध्ये, 24,57,792 रुपये मूल्याची दावा नसलेली प्रत्येकी 582 ग्राम वजनाची 24 कॅरेट सोन्याची दहा तोळ्याची पाच बिस्किटे आणि अंदाजे एकूण वजन 2554 ग्रॅम असलेले आणि 2350 ग्राम निव्वळ वजनाचे अंदाजे 99,24,073 रुपये किंमतीचे एकूण 1,23,81,865 रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. शौचालयात आरशाच्या मागे असलेल्या पत्र्यामागे हे सोने लपविण्यात आले होते.

सीमाशुल्क न भरता भारतात तस्करी करत सीमाशुल्क कायद्याचे उल्लंघन केल्याची खात्री पटल्यानंतर पंचनामा करून हे सोने जप्त करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.