Wrestling | विनेश फोगटची सुवर्ण कामगिरी

रोम – भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने मट्टे पेलेकोन रॅंकिंग मालिका स्पर्धेत सलग आठवड्यांमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. तसेच बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे. आता त्याचा सामना मंगोलियाच्या तुल्गा तुमुर ओचिर याच्याशी होणार आहे.

जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी 26 वर्षीय विनेश टोकियो गेम्ससाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. विनेशने 53 किलो वजनी गटात कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरला 4-0 ने हरवले.

गेल्या आठवड्यात विनेशने किवमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. स्पर्धेत प्रवेश करताना तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विनेशने 14 गुणांची कमाई करत जागतिक क्रमवारीत आपले प्रथम स्थान परत मिळवले. विनेशने या स्पर्धेत एकही गुण गमावला नाही. शनिवारी सरिता मोरने 57 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.