मुंबई – राज्यात मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कात दसरा मेळावा (Dasara Melava 2023) कोण घेणार ? यावरून राजकारण सुरु झाले होते. मात्र या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) दोघांनीही शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास आग्रह धरला होता. आता मात्र शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत, शिवाजी पार्क मैदानासाठीचा अर्ज मागे घेतल्याचे समोर आले. शिंदे गटाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
यंदा १ ऑगस्ट रोजी ठाकरे गटाने तर ७ ऑगस्ट रोजी शिंदे गटाने महापालिकेकडं शिवाजी पार्कवर (Shivaji park) मेळाव्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा न्यायालयात जाणार कि काय अशी स्थिती निर्माण झाली होती.अशात शिंदे गटाकडून वाद टाळण्यासाठी अर्ज मागे घेण्यात आल्याचे समोर आले. सदा सरवणकर यांनी याबाबतची प्रतिक्रिया देखील दिली होती.
मातोश्री येथे आज नंदीबैल घेऊन वासुदेवाच्या पोषाखात सेवेकरी उद्धव ठाकरेंची (uddhav thackeray) भेट घेण्यासाठी आले होते.यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारत त्यांच्याशी संवाद देखील साधला. “शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. यावर्षीसुद्धा वाजत गाजत उत्साहाने शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ येथे दसरा मेळावा होणार आहे” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
वाजत गाजत गुलाल उधळत जायचंय,
साहेबांना दिलेलं वचन पूर्ण करायचंय!
चलो, शिवतिर्थ!#shivsena pic.twitter.com/cFwvlKLBxj— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 10, 2023
काय म्हणाले सदा सरवणकर
“शिवाजी पार्क हे मैदान आम्हाला हिंदुत्वाच्या विचारांसाठी मिळावं, अशी आमची भूमिका होती. पण, वाद टाळण्यासाठी आझाद मैदान किंवा क्रांती मैदानातून हिंदुत्वाचे विचार आपल्याला मांडता येतील, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांची आहे,अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली.