मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकारपरिषदेतून पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर सविस्तर भाष्य करणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी, आमदार अपात्रतेच्या प्रलंबित प्रकरणावर निकाल दिला होता. नार्वेकर यांचा निकाल अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या शिंदे गटासाठी मोठा दिलासा ठरला. ठाकरे गटातर्फे मात्र विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर जोरदार आक्षेप घेण्यात आला होता.
आजच्या पत्राकारपरिषदेतून उद्धव ठाकरे अध्यक्षांच्या निकालाबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. मुंबईतील वरळी डोम येथे ही पत्रकार परिषद होत आहे.
पाहा लाईव्ह पत्रकार परिषद —