फुरसुंगी (प्रतिनिधी) -: कोरोना विषाणूमुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व उत्सव,सण, जत्रा रद्द केल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना उपजिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे यांनी आपला मुलगा ओंकार शेवाळे याचा वाढदिवस साजरा न करता गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले आहे.
लॉकडाऊन काळात जीवाची पर्वा न करता पोलिस कर्मचारी आपली सेवा देत आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांना शेवाळे यांनी सॅनिटायजरचे वाटप केले आहे. शेवाळे यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतूक केले आहे. आपल्या भागात असलेल्या गोरगरीब, गरजू, मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या लोकांना आपल्या पध्दतीने शक्य होईल तेवढी मदत करावी असे अवाहन शेवाळे यांनी केले.