ब्लोएमफोन्टेन, (दक्षिण आफ्रिका) – आयसीसीच्या 19 वर्षांखालील युवा विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार,दि.25) भारतीय संघाचा सामना आयर्लंडशी (India Vs Ireland) होणार आहे. या स्पर्धेची थाटात सुरुवात करताना भारतीय संघाने बांगलादेशचा 84 धावांनी पराभव करत धडाकेबाज सलामी दिली होती. आता भारताला आयर्लंडविरुद्ध प्रयोग करण्याची संधी आहे, कारण त्यांना पुढील आठवड्यापासून सुपर सिक्स टप्प्यात कडव्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे.
उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या (ICC U-19 Men’s World Cup 2024) स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून अफलातून केळ केला आहे. त्याच्यासह अदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी हे देखील नावारुपाला येत आहेत. तर सौम्य पांडे व मुशीर खान यांनी गोलंदाजीत चमक दाखवली आहे.
या संघाच्या तुलनेत आयर्लंडचा संघ काहीसा कमकुवत वाटत आहे. त्यामुळे सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी भारतीय संघाला आहे. भारतासमोर आव्हान प्रतिस्पर्धी संघाचे नसून स्वत:च्या कामगिरीची पातळी सुधारण्याचे असेल. दुसरीकडे पहिल्या सामन्यात आयर्लंडने अमेरिकेचा पराभव केला होता