मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्याच मॅथ्यु एब्डेनसह खेळताना भारताच्या रोहन बोपण्णाने इतिहास रचला आहे. वयाच्या 43 व्या वर्षी पुरुष दुहेरीत द्वितीय मानांकन प्राप्त करणारा बोपण्णा भारताचा पहिलाच टेनिसपटू ठरला. त्याने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेन्टिनाच्या मॅक्सिमो गोंलजालेज व आंद्रेस मोल्टेनी या जोडीवर 6-4,7-6 अशी मात केली व उपांत्य फेरीत प्रवेश केला.
त्याचवेळी, या विजयानंतर रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेन (Rohan Bopanna & Matt Ebden) हे पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत नंबर-1 बनले आहेत. रोहन बोपण्णाने प्रथमच ही कामगिरी केली. विशेष म्हणजे वयाच्या 43 व्या वर्षी तो पहिल्यांदाच टॉपवर पोहोचला आहे. बोपण्णा प्रथमच नंबर-1 बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. आता उपांत्य पेरीत एब्डेन व बोपण्णा यांचा सामना चेक प्रजासत्ताकच्या थॉमस मचाक व चीनच्या झिजेन झांग यांच्याशी होणार आहे. बोपण्णाने विजेतेपद पटकावल्यास तो ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरी चॅम्पियन बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनेल.
𝑨𝒈𝒆𝒊𝒏𝒈 𝒍𝒊𝒌𝒆 𝒇𝒊𝒏𝒆 𝒘𝒊𝒏𝒆 🫡
Indian Tennis Legend and Bengaluru’s very own Rohan Bopanna is now the oldest World No.1 in Doubles! 🙌#PlayBold #AustralianOpen #AusOpen #SlamOfTheGreats @rohanbopanna
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) January 24, 2024
बोपन्नाने मोडला राजीव रामचा विक्रम….
बोपण्णाने भारतीय वंशाचे अमेरिकन खेळाडू राजीव राम यांची कामगिरीही मागे टालकी आहे. अमेरिकेच्या राजीव राम यांनी पुरूष दुहेरीत आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये सर्वात वयस्कर अव्वल क्रमांकाचे खेळाडू म्हणून विक्रमी कामगिरी केली होती. ऑक्टोबर 2022 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी हा विक्रम केला होता. बोपण्णाने 2013 मध्ये पहिल्यांदा क्रमवारीत सर्वोच्च तिसरे स्थान मिळवले होते. बोपण्णा आता लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर जागतिक दुहेरी टेनिस स्पर्धेत मानांकन प्राप्त करणारा भारताचा चौथा टेनिसपटू ठरला आहे.
असाही नोंदवला विक्रम….
बोपण्णाच्या या विजयाने सर्व ग्रँडस्लॅममध्ये किमान उपांत्य फेरी गाठण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. 2011, 2016, 2018 आणि 2021 मध्ये चार उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर बोपण्णाने 2022 मध्ये मॅटवे मिडेलकूपसह फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली. विम्बल्डनमध्ये त्याने 2013, 2015 आणि 2023 मध्ये तीन वेळा उपांत्य फेरी गाठली होती. त्याच वेळी, तो दोनदा (2010 आणि 2023) यूएस ओपनमध्ये अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याला आतापर्यंत दुहेरीत एकही ग्रँडस्लॅम जिंकता आलेले नाही.