U19 World Cup 2024 Super Six phase,India vs Nepal Cricket Match Score : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा सामना नेपाळशी होत आहे. सुपर सिक्स फेरीतील टीम इंडियाचा हा शेवटचा सामना आहे. सुपर सिक्समध्ये दोन गट तयार करण्यात आले असून अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. भारतीय संघ सुपर-सिक्स गटात अव्वल स्थानावर आहे.
भारतीय कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच विकेट गमावत 50 षटकात 297 धावा केल्या आहेत. नेपाळसमोर आता विजयासाठी 298 धावाचे लक्ष्य असेल. भारताकडून कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी शतके झळकावली. सचिनने 101 चेंडूत 116 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तर उदय सहारनने 107 चेंडूंत नऊ चौकारांसह 100 धावा केल्या.
Innings break!
Centuries from Sachin Dhas & Captain Uday Saharan power #TeamIndia to 297/5 👏👏
Stay tuned for the second innings ⏳
Scorecard ▶️ https://t.co/6Vp3LnoN6N#BoysInBlue | #INDvNEP pic.twitter.com/bkOR245hwD
— BCCI (@BCCI) February 2, 2024
या दोघांशिवाय भारताचा एकही फलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही. आदर्श सिंग 21 धावा करून, अर्शिन कुलकर्णी 18 आणि प्रियांशू मोलिया 19 धावा करून बाद झाले. शेवटी मुशीर खानने नाबाद नऊ धावा केल्या. नेपाळकडून गोलंदाजीत गुलशन झा याने सर्वाधिक तीन बळी घेतले. आकाश चंदला एक विकेट मिळाली.
भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास…
भारतीय संघाने आतापर्यंत गट फेरी आणि सुपर सिक्ससह एकूण चार सामने खेळले असून चारही सामने जिंकले आहेत. गट फेरीतील तिन लढतीत आशियाई चॅम्पियन बांगलादेशविरुद्धच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 84 धावांनी विजय मिळवला. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आयर्लंडचा 201 धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने यूएसए विरुद्ध 201 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर , सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला.