India U19 vs South Africa U19, World Cup 2024 : 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतानं उपांत्य फेरीचा सामना दोन गडी राखून जिंकला. भारतीय संघाला विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य होते. भारताने हे लक्ष्य 48.5 षटकांत 8 विकेट्स राखून पूर्ण केले. या संपूर्ण स्पर्धेत संघ अपराजित आहे. त्याने सलग सहावा सामना जिंकला आहे.
भारताने एकूण नववेळा अंडर-19 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. भारताला सलग 5व्यांदा अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे. याआधी भारताने 2016, 2018, 2020 आणि 2022 मध्ये अंतिम फेरी गाठली आहे. भारत पाच वेळा चॅम्पियन बनला असून तीनदा फायनलमध्ये पराभूत झाला आहे. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. तिथे टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान यांच्यातील विजेता संघाशी होईल.
When the going got tough, Captain Uday Saharan got going 👏👏
For stitching a match-winning partnership with Sachin Dhas, #TeamIndia Captain receives the Player of the Match Award 🙌
Scorecard ▶️ https://t.co/Ay8YmV8QDg#U19WorldCup | #INDvSA pic.twitter.com/VKdeYq9CDp
— BCCI (@BCCI) February 6, 2024
भारताकडून सचिन दासने सर्वाधिक धावा केल्या. सचिन दासने 95 चेंडूत 96 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारनने 124 चेंडूत 81 धावा केल्या. उदय सहारन आणि सचिन दास यांच्यात 171 धावांची भागीदारी झाली.
दक्षिण आफ्रिकेच्या 244 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर आदर्श सिंग एकही धाव न काढता बाद झाला. अर्शीन कुलकर्णीने 30 चेंडूत 12 धावा केल्या. या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या मुशीर खानला केवळ 4 धावा करता आल्या. तर प्रियांशू मोलिया 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. 32 धावांवर 4 विकेट गमावत भारतीय संघ संघर्ष करत होता, परंतु यानंतर भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारन आणि सचिन दास यांनी टीम इंडियाला विजयापर्यंत नेले.
दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रिस्टन लुस हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ट्रिस्टन लुस आणि मेना फाका यांना 3-3 यश मिळाले. पण याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे बाकीचे फलंदाज विकेट्ससाठी झगडत राहिले. त्यामुळे सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत भारतीय संघाने लक्ष्य गाठले.
#U19WorldCup2024 Semi-final 1 : द.आफ्रिकेचे ‘टीम इंडिया’समोर माफक आव्हान…
तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 4 गडी गमावून 244 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर जुआन ड्रे प्रिटोरियसने 102 चेंडूत सर्वाधिक 76 धावा केल्या. याशिवाय रिचर्ड सेलेस्वीनने 100 चेंडूत 64 धावांचे योगदान दिले.
भारताकडून राज लिंबानी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. राज लिंबानीने 9 षटकांत 60 धावांत 3 फलंदाज बाद केले. मुशीर खानला 2 यश मिळाले. याशिवाय नमन तिवारी आणि सौमी पांडेने प्रत्येकी 1 बळी घेतला.