पुणे – ग्रेसिया स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांच्या तर्फे आयोजित ‘विराट करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमी संघाने विजयांचा चौकार वसूल केला. एके स्पोर्ट्स संघाने स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अॅकॅडमीचा पराभव करून पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले.
धायरी येथील स्टार स्पोर्ट्स अकादमी मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत अनेय पद्मेश याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमीने अष्टपैलू स्पोर्ट्स संघाचा १४ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमीने १२७ धावांचे लक्ष्य उभे केले. अ
नेय पद्मेश याने ३२ धावांची खेळी केली. आदित्य बालगुंडे आणि शाश्वत पांड्या यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करून गॅरी संघाच्या धावसंख्येला वेसण घातली. या आव्हानासमोर अष्टपैलू स्पोर्ट्सचा डाव ११३ धावांवर मर्यादित राहीला. सर्वेश होनराव याने ४० धावांची खेळी केली. अक्क्षत बाजपेयी याने ३० धावात ३ गडी बाद केले. रेहान पठाण आणि अनेय पद्मेश यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले आणि संघाला विजय मिळवून दिला.
राजवीर देशमुख याच्या ५८ धावांच्या जोरावर एके स्पोर्ट्स संघाने स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीचा १४६ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजवीर देशमुखच्या ५८ धावांच्या जोरावर एके स्पोर्ट्सने २१३ धावांचा डोंगर उभा केला. मल्हार गोरे याने ५२ धावांची तर, तनवी गुप्ते हिने नाबाद ३७ धावांची खेळी करून संघाला विशाल धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानासमोर स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीचा डाव ६७ धावांवर गडगडला.