पुणे – ससून रुग्णालयातून पळून गेलेला अंमलीपदार्थ तस्कर ललित पाटील याच्या पलायनप्रकरणी दोन पोलीस अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचा चौकशी अहवाल मुख्यालयाच्या उपायुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांची सहायक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे.
ललितने “प्लॅन’ आखून पलायन केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या चौकशीत कारागृह, पोलीस आणि ससून प्रशासनातील अधिकाऱ्यांची नावे उघड होण्याची शक्यता तब्बल दहा पथके मागावर ललित पाटीलच्या शोधार्थ गुन्हे शाखेची आठ आणि बंडगार्डन पोलीस ठाण्याची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. पथकांना अद्याप त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामदास पोकळे यांनी दिली.
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ललितचा भाऊ आणि त्यांच्याशी संबंधित महिला वकील घर बंद करून निघून गेल्याचे पोकळे यांनी सांगितले. होती, अशीही चर्चा आहे. ससून सर्वोपचार रुग्णारलयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या रुग्णांच्या बंदोबस्तासाठी मुख्यालयाअंतर्गत असणाऱ्या कोर्ट पार्टीचे पोलीस कर्मचारी नेमले जातात. हे कर्मचारी शिफ्टप्रमाणे नेमले जातात. तेथे अमली पदार्थ सापडले तेव्हा बंदोबस्तावर एक सहायक उपनिरीक्षक आणि तीन अंमलदार होते.
याप्रकरणी या चौघांची चौकशी होणार आहे. तर, तो पळून गेलेल्या दिवशी बंदोबस्तावर एक महिला पोलीस उपनिरीक्षक आणि चार अंमलदार बंदोबस्तावर होते. तर दुसरीकडे उपायुक्तांकडून ससून प्रशासनाला वॉर्डाच्या आत सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात पत्र पाठवण्यात येणार आहे.
अंमलीपदार्थ तस्करी प्रकरणात सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश काळे, कॉन्स्टेबल विशाल टोपले, स्वप्निल शिंदे, दिगंबर चंदनशिव तर ललित पाटील याच्या पलायन प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हेड कॉन्स्टेबल आदेश शिवणकर, पोलीस नाईक नाथाराम काळे, कॉन्स्टेबल पिरप्पा बनसोडे, अमित जाधव यांना निलंबित केले.