इस्लामाबाद -करोना संसर्गामुळे पाकिस्तानमधील दोन आमदार बुधवारी मृत्युमुखी पडले. त्या देशात मंगळवारीच सिंध प्रांताचे एक मंत्री करोनाचे बळी ठरले. त्या घडामोडींमुळे पाकिस्तानमधील करोना फैलावाची चिंताजनक स्थिती पुन्हा उघड झाली आहे.
पाकिस्तानात करोनाने हाहाकार उडवला आहे. त्या देशातील करोनाबाधितांची संख्या 80 हजारांवर गेली आहे. करोना संसर्ग झालेल्यांत राजकीय नेत्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अशातच मंगळवारी त्या देशातील सिंध प्रांताचे करोनाबाधित मंत्री गुलाम मुर्तझा बलुच यांचे निधन झाले. त्यापाठोपाठ खैबर पख्तुनख्वा आणि पंजाब या प्रांतांमधील प्रत्येकी एक आमदार दगावला. त्यामुळे पाकिस्तानमधील आरोग्य यंत्रणांचे अपयश चव्हाट्यावर आले आहे. त्या देशात करोनाने आतापर्यंत 1 हजार 688 बाधितांचा बळी घेतला आहे.