कराड, (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत रविवारी सकाळी 11 च्या सुमारास एका वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील प्रशांत विश्वास भोसले (वय 34) आणि अमर तुकाराम अलगुडे (वय 35, रा. धनकवडी, पुणे) हे जागीच ठार झाले. याप्रकरणी प्रवीण भीमराव शिंदे (वय 45, रा. वाठार) यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा-कोल्हापूर लेनवर वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत भरधाव वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील प्रशांत भोसले व अमर अलगुडे हे जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती डी. पी. जैन कंपनीचे पीआरओ दस्तगीर आगा यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यांनी रुग्णवाहिकाही बोलावून घेतली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. हिंदुराव चव्हाण, सुनील कदम, तुषार जोशी यांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले.