बारामती – मोढवे (ता. बारामती) येथे आजोळी आलेल्या 7 व 18 वर्षे वयाच्या दोन मुली करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. बारामती शहरानंतर पुन्हा एकदा तालुक्यात देखील करोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील करोनाची संख्या 25 वर पोहोचली आहे.
भांडूप (मुंबई) येथून या मुली मोडवे येथे रविवारी (दि. 14) आजोळी आल्या आहेत. शुक्रवारी (दि. 19) या मुलींची आई करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आजोळी आलेल्या दोन्ही मुलींची तपासणी केली असता त्या करोना संक्रमीत असल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर रुई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मोढवे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटाझरचा वापर करणे गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.