कराड – कराड शहर व तालुका परिसरात गुन्हे करणार्या आबिद आलम मुजावर (वय 26) आणि साहिल आलम मुजावर (वय 21, रा. पालकर वाडा, मंगळवार पेठ, कराड) यांना दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे.
या या दोघांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यांमधून दोन वर्षे हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी पाठवला होता. त्यास पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी मान्यता दिली होती.
हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात या दोघांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये दोन वर्षांसाठी हद्दपारीचा आदेश पारीत करण्यात आला. पोलिसांनी नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत 16 टोळ्यांमधील 51 जणांना हद्दपार केले आहे.