काठमांडू ( Climbers died on Everest ) – अमेरिका आणि स्वित्झर्लंडमधील दोन गिर्यारोहकांचा माउंट एव्हरेस्टवर मृत्यू झाला असून यंदाच्या मोसमातील ही पहिली दुर्घटना झाल्याचे नेपाळमधील मोहीम संयोजकांनी गुरुवारी सांगितले. बुधवारी दोन गिर्यारोहकांचे निधन झाले, असे सेव्हन समिट ट्रेक्सच्या मिंग्मा शेर्पा यांनी सांगितले.
स्विस गिर्यारोहक शिखरावर पोहोचला आणि शिखरावर पोहोचल्यावर तो थकल्यासारखा झाला होता, असे त्याच संघटनेच्या छंग दावा शेर्पा यांनी सांगितले. आम्ही ऑक्सिजन आणि अन्न पदार्थांसह दोन अतिरिक्त शेर्पा पाठविले, दुर्दैवाने ते त्या गिर्यारोहकाला वाचवू शकले नाहीत, असे त्यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले.
तर अमेरिकन गिर्यारोहक हिलरी टप्प्यावर पोहोचला; परंतु त्याला बर्फाळपणा आणि थकवा सहन न झाल्यामुळे शेर्पांनी परत येण्यास मदत केली, असे आयोजकांनी सांगितले. तो कॅम्प 4 वर पोहोचण्यास सक्षम होता, परंतु नंतर त्याचा मृत्यू झाला.
अलीकडच्या हंगामात, एव्हरेस्टमध्ये गिर्यारोहकांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे आणि त्यामुळे झालेल्या गर्दीमुळे जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याचे मानले जात आहे.
गर्दी कमी करण्यासाठी नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाने योग्य हवामानाच्या प्रत्येक श्रेणीनुसार एव्हरेस्टवर जाण्याची शक्यता असलेल्या लोकांची संख्या कमी करण्याचे नियम जाहीर केले आहेत.