सोलापूर, दि. 13 – गुलबर्गा शहरातून हरवलेला मतिमंद कृष्णा 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सोलापूर रेल्वे स्थानकावर सापडला आणि त्याची आई लक्ष्मी कृष्णा भेटल्यामुळे टेन्शन फ्री झाली.
लक्ष्मी दोडमनी या गुलबर्गामधील राहणाऱ्या आईचा कृष्णा हा 11 वर्षाचा मतिमंद मुलगा आहे. काल सकाळपासून तो हरवला होता. गुलबर्गा शहरापासून विविध ठिकाणी शोधाशोध केली तरी काही केल्या तो सापडत नव्हता. अखेर सोलापूर रेल्वे पोलिस फोर्सच्या क्राइम ब्रांच विभागाकडे एक मुलगा सापडला होता.
हाच तो काल गुलबर्गा येथून हरवलेला कृष्णा असल्याची खात्री पटल्यानंतर रेल्वे पोलिस फोर्सच्या क्राईम ब्रांचने गुलबर्गा येथे त्याच्या आई-वडिलांना संपर्क साधला आणि सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गुरुवारी दुपारी 48 तासानंतर कृष्णाची आपल्या आईशी भेट झाली. त्यामुळे दोडमनी कुटुंबाने रेल्वे पोलिस फोर्सच्या क्राइम ब्रांचचे कौतुक केले.