उत्तरप्रदेशमध्ये डबल डेकर रेल्वे रूळावरून घसरली

लखनऊ – उत्तरप्रदेशमध्ये लखनऊ आनंद विहार( दिल्ली) या डबल डेकर रेल्वेचे दोन डबे रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये कुणी जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या घटनेत रेल्वेची पाचवी आणि आठवी बोगी रुळावरून घसरली. सध्या मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर रेल्वे विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. दिल्लीतील आनंद विहार या ठिकाणी जात असताना रेल्वे मुरादाबाद आणि कटघर दरम्यान रुळावरुन खाली घसरली. ही घटना लेवल क्रॉसिंग गेट नंबर ४१५ वर घडला. बचाव पथकाने मदतकार्य सुरू केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.