केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरासाठी “अच्छे दिन’

कमी व्याजदरावर मिळणार “ऍडव्हान्स’ रक्‍कम 

पुणे  – सरकार सर्वसाधारणपणे व्याजदरकपात आणि भांडवल सुलभतेद्वारा घर निर्मितीला चालना देत आहे. आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घर घेण्यासाठी भांडवल उभारणीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्यांना कमी व्याजदरात ऍडव्हान्स देऊ केला आहे.

केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना घर घेता यावे, याकरिता हाऊस बिल्डिंग ऍडव्हान्स (एचबीए) उपलब्ध करते. या ऍडव्हॉन्सवरील व्याजदर आता पुढील एक वर्षासाठी केवळ 7.9 टक्के इतका करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्याकडून घर घेणे किंवा बांधण्याला चालना मिळावी, यासाठी केंद्रीय नगर विकास आणि घर बांधणी मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

या पत्रकानुसार, 1 ऑक्‍टोबरपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हाऊस बिल्डिंग ऍडव्हान्सवरील व्याजदर कमी करून 7.9 टक्के करण्यात आला आहे. गेल्या वर्षी तो 8.5 टक्के इतका होता. गेल्या एक-दोन वर्षांत सर्वसाधारण व्याजदर जास्त होते. त्याचबरोबर मंदीची परिस्थिती होती. त्यामुळे अनेकांनी घर घेणे किंवा बांधणे लांबणीवर टाकले होते. आता घर घेण्यास किंवा बांधण्यास चालना मिळावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.