धक्‍कादायक..! थायलंडच्या न्यायाधिशाचा न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न

बॅंकॉक : थायलंडच्या याला प्रांतात एका न्यायाधिशांनी न्यायालयातच आत्महत्येचा प्र्रयत्न केला आहे. या धक्‍कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याला प्रांतात खानाकोर्न पियांचना यांनी शुक्रवारी कोर्टरुममध्ये स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला. हे करण्याअगोदर त्यांनी 25 पानांचे सुसाइड नोट लिहून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही नोट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते निष्पक्ष निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र नसल्याचे यामध्ये म्हटले आहे. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या पियांचना यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पियांचना बॅंकॉकमध्ये यालाच्या दक्षिणी प्रांताच्या एका कोर्टात न्यायाधीश आहेत. शुक्रवारी कोर्टात पाच आरोपींना मुक्त करण्यात आले. यादरम्यान न्यायाधीशाने कोर्टरुममध्ये स्वतःवर गोळी झाडली. त्यांना तात्काळ उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. न्यायाधीशांनी सांगितल्यानुसार, ज्या पाच आरोपींची कोर्टाने मुक्तता केली. त्यामधील तिघांना मृत्यूदंड होऊ शकला असता. सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, न्यायाधीशाने फेसबुक अकाउंटवरुन 25 पानांची नोट आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप लावण्यात आले आहे.

तर कोर्टाचे प्रवक्ते म्हणाले की, पियांचना यांनी वयक्तिक कारणांवरुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तर काही कायदेतज्ञांनुसार पियांचना यांचे आरोप योग्य आहेत. न्यायाधीशाने जे आरोप लावले आहे ते सत्य असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांच्यानुसार, वरिष्ठ अधिकारी अनेक वेळा निर्णय बदलण्यास भाग पडतात किंवा स्वतःच बदल करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.