मुझफ्फरनगर (यूपी) – उत्तरप्रदेशातील केलवाडा गावात सोमवारी फटाक्यांच्या दुकानात झालेल्या स्फोटात दोन मुलांचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या आगीने अचानक मोठे रूप धारण केले त्यामुळे तेथील लोकांना त्वरीत बाहेर पडणे शक्य झाले नाही.
या स्फोटात हिमांशू (१२) आणि पारस (१४) ही दोन मुले ठार झाली. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे तीन पीडित घराच्या वरच्या मजल्यावरील फटाक्यांच्या दुकानात काम करत असताना ही घटना घडली, एएसपी म्हणाले की, घराचा मालक शादाबला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.