Pune Crime: महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला धक्काबुक्की प्रकरणी दोघे अटकेत

पुणे – वीजपुरवठा खंडीत झाल्याने महावितरणच्या कोंढवा कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. दत्तात्रय धांडेकर (वय ३५), प्रथमेश धांडेकर (वय ३२, रा. दोघे रा. धांडेकर वस्ती, येवलेवाडी, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महावितरणचे सहाय्यक अभियंता सुनील पाटील (वय ५६, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महावितरणचे कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळ कार्यालय आहे.

बुधवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी दहाच्या सुमारास धांडेकर महावितरणच्या कार्यालयात गेले. रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला असल्याचे धांडेकर यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी महावितरणच्या कार्यालयात गोंधळ घालून कर्मचारी कृष्णा गुट्टे यांना धक्काबुक्की केली तसेच सहाय्यक अभियंता पाटील यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकऱणी धांडेकर यांना अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.