सातारा -खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा, वाई व महाबळेश्वर या नगरपालिका व कोरेगाव, लोणंद, मेढा नगरपंचायतीच्या क्षेत्रातील विकासकामांसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने हा निधी मंजूर केल्याने या शहरांतील विकासकामे मार्गी लागणार आहेत, अशी माहिती खासदार पाटील यांच्या सूत्रांद्वारे देण्यात आली.
नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय्य योजनेतंगर्त तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत नगरपरिषदांना हा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सातारा पालिका कार्यक्षेत्रामधील अजिंक्य कॉलनीत (पोवई नाका) येथे अजिंक्यतारा सोसायटीच्या खुल्या जागेत सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी 10 लाख, कोडोली येथील रस्ते कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 15 लाख, पीरवाडी येथील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे तसेच एस. टी. कॉलनीच्या पाठीमागे राजेंद्र सरकाळे यांच्या घराशेजारून रस्ता करण्याच्या कामासाठी 20 लाख असा.
सातारा पालिकेसाठी 45 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. कोरेगाव नगरपंचायतीमधील भैरवनाथ मंदिर रस्ता ते मोहितेवाडा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व अंडरग्राउंड ड्रेनेज करणे 25 लाख, लालसिंगराव शिंदे यांच्या घरापासून ते चंद्रकांत जाधव घर कॉंक्रिटीकरण व अंडरग्राउंड ड्रेनेज करणे 25 लाख असा एकूण 50 लाख निधी मंजूर झाला आहे.
महाबळेश्वर पालिकेमधील नामदेव हौसिंग सोसायटी ऍप्रोच रोड अंडरग्राउंड केबलिंग वर्क करणे 10 लाख, अंबिका हाउसिंग सोसायटी ऍप्रोच रोड अंडरग्राउंड केबलिंग वर्क करणे 10 लाख असा एकूण 20 लाख, मेढा नगरपंचायतीमधील मेढा मुख्य रस्ता व मुख्य चौक येथे हायमास्ट दिवे 5 नग बसवणे 10 लाख, लक्ष्मीमाता मंदिर (देशमुखवाडी) संरक्षक भिंत व मोकळ्या जागेमध्ये जिमखाना बांधण्यासाठी 25 लाख असा एकूण 35 लाख निधी मंजूर झाला आहे. वाई नगरपालिकेमधील हॉटेल पर्ल ते रेस्ट हाऊस फूटपाथ बनवणे 20 लाख, वार्ड क्रमांक 9 ख्रिश्चन दफनभूमीसाठी शेड बांधणे आणि लादीकरण करणे.
20 लाख, गणपती आळीतील फुले घर ते तन्ना घरपर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे 20 लाख असा एकूण 60 लाख तर लोणंद नगरपंचायतीमधीलप्रभाग क्रमांक 9 मंदार दुरगुडे ते महादेव मंदिर रस्ता खेमवती नदी बंदिस्त गटारे व कॉंक्रिटीकरण करणे 15 लाख, प्रभाग क्रमांक 12 मधील घाडगे कॉलनी भिंत ते रावळ घर बंदिस्त गटारे व कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, प्रभाग क्रमांक 11 खताल घर ते चव्हाण घर बंदिस्त गटारे व कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख, प्रभाग क्रमांक 10 मधील किरण खरात घर ते बबन खरात घर येथे घटक व सिमेंट कॉंक्रेट रस्ता करणे 10 लाख असा एकूण 40 लाख निधी मंजूर झाला आहे.
खा. श्रीनिवास पाटील यांनी नगरपालिका व नगरपंचायतीच्या कामांना गती मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रव्यवहार करून निधी मंजूर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.
===================