नवी दिल्ली – पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारच्या कायदेशीर मागणीवरूनच ट्विटरने पाकिस्तान सरकारच्या अकाउंटवर कारवाई केली आहे. पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल @GovtofPakistan आहे. आता हे अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.
या कारवाईनंतर भारतातील लोक हे अकाऊंट पाहू शकणार नाहीत. पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकवेळा पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतामध्ये ब्लॉक करण्यात आलं आहे. ट्विटरच्या गाईडलाईन्सनुसार, न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी यांसारख्या वैध कायदेशीर मागणीनंतर ट्विटर हँडल ब्लॉक करावे लागते. दिलेल्या रीपोर्टनुसार पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सक्रिय आहे.
या प्रकरणामध्ये भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर गेल्यानंतर तिथे लिहिलं आहे की, “भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचे भारतातील ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आले आहे.