शिरूर- मलठण (ता. शिरूर) येथील माजी सैनिक नानाभाऊ फुलसुंदर यांनी करोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पंचवीस हजार रूपये व 50 गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मलठण येथील माजी सैनिक नाना भाऊ नामदेव फुलसुंदर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजार रुपयांचा धनादेश तलाठी प्रशांत शेटे यांच्याकडे सुपूर्त केला. तसेच त्यांनी 50 कुटुंबांना जीवनाश्यक वस्तुंचे किट तयार करून गरीब कुटुबांना वाटप करण्यात आले. या वेळी तहसीलदार लैला शेख, उद्योजक आबासाहेब पवार, प्रा. युवराज थोरात, उद्योजक रामा गायकवाड, पोलीस पाटील देवीदास थोरात उपस्थित होते.