Entertainment । बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या क्रिकेट ड्रामामध्ये ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे.
प्रमोशनदरम्यान जान्हवीला विचारण्यात आले की तिला सारा अली खानला तुझ्या जागी रिप्लेस करण्यात आले का? एका मुलाखतीत जान्हवीला विचारण्यात आले की ‘सिम्बा’मधून तुझ्या जागी सारा ला रिप्लेस करण्यात आले होते यावर तिने फक्त स्मित हास्य देत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.
रिपोर्टनुसार, जान्हवीने आधीच रणवीर सिंगसोबत काम करण्याबाबत बोलणे सुरू केले होते, तर तिला करारानुसार असे करण्यास मनाई करण्यात आली होती. 2018 मध्ये सारा अली खानचा डेब्यू ‘केदारनाथ’ तसेच याच महिन्यात ‘सिम्बा’ रिलीज झाला होता. साराने ‘सिम्बा’ तिच्या पासून हिसकावल्याचीही चर्चा यादरम्यान रंगली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी जान्हवीने धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘धडक’मधून पदार्पण केले होते.
‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शक शरण शर्मा यांनी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर अँड मिसेस’ हा राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा एकत्र दुसरा चित्रपट आहे.
हे वाचाल का ? अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’मध्ये तृप्ती डिमरीची एन्ट्री..!