वॉशिंग्टन – अमेरिकेत एका भारतीयाने नोकरीवरुन काढल्याने बदला म्हणून कंपनीच्या सर्व्हरवरुन 1200 पेक्षा अधिक अकाऊंट डिलिट केल्याचा प्रकार घडला आहे. त्याच्या या कृत्यासाठी कॅलिफोर्नियातील न्यायालयाने त्याला या प्रकरणी दोषी ठरवत 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दीपांशु खेर असे या भारतीयाचे नाव आहे. विशेष म्हणजे तो दिल्लीहून अमेरिकेत परतल्यानंतर 11 जानेवारी 2021 रोजी त्याला अटक करण्यात आली.
दीपांशु खेर 2017 पासून मे 2018 पर्यंत अमेरिकेतील एका आयटी सल्लागार कंपनीत नोकरी करत होता. 2017 मध्ये या कंपनीकडे कार्ल्सबॅंड कंपनीचे काम आले. या कंपनीला मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 मध्ये शिफ्ट व्हायचे होते.
या कामासाठी आयटी सल्लागार कंपनीने दीपांशु खरेला या कंपनीच्या मदतीसाठी पाठवले. मात्र, कंपनी खेर यांच्या कामावर समाधानी नव्हती. ही गोष्ट कंपनीने फर्मला सांगितली. जानेवारी 2018 मध्ये खेर यांच्या सल्लागार फर्मने खेर यांना मुख्यालयाला परत बोलावले. काही महिन्यांनंतर 4 मे 2018 रोजी या फर्मने खेर यांना नोकरीवरुन काढून टाकले. यानंतर खेर दिल्लीला परत आला.
8 ऑगस्ट 2018 रोजी दीपांशु खरे पुन्हा भारतातून अमेरिकेत परतला. यानंतर त्याने कार्ल्सबॅंड कंपनीचं सर्व्हर हॅक केले आणि 1500 पैकी 1200 अकाऊंट डिलिट केले.