तुकाराम मुंढे होते म्हणून धोका टळला, नाहीतर…

नागपूर- नागपुरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा परिसर हे दोन कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले आहेत. त्यामुळे या परिसरात जास्त खबरदारी घेतली जात आहे. या परिसरात कोरोनाचे रुग्ण जास्त असल्यामुळे अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील 43 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाच दिवसात 600 जणांना क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कोरोनाचा धोका टळला. त्यांच्यावर गेलेकाही दिवस अनेक बाबींवरुन विरोध होत होता. मात्र त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली.

दरम्यान, या दोन्ही परिसरातील एकूण 2300 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. संसर्गाचा धोका दिसताच आणखी काही लोकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.