अहमदाबाद– दहशतवाद्यांसोबत दोन हात करण्यासाठी अमेरीका भारताला नेहमी साथ देईल, असं अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. ते नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात बोलत होते.
अमेरीका आणि भारत हे दोन्ही देश सध्या इस्लामिक दहशातवाद्यांपासून नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझ्या कार्यकाळात आयएसआयएस (इसिस) विरोधात ताकद वापरण्याची लष्कराला अधिकार दिले, असंही ट्रम्प म्हणाले.
इसिसचा जवळपास नायनाट झाला आहे, त्यांचे उपद्रव मुल्य संपुर्ण संपवले आहे. त्यांच्या म्होरक्या अल बगदादी याचाही आम्ही खात्मा केला आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, भारतात येऊन जेव्हा ट्रम्प यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला तेव्हा संपुर्ण मोटेरा स्टेडियममध्ये सुमारे दीड लाख लोकांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.