तुळजापुर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत व साडेतीन शक्ती पीठा पैकी एक पुर्ण पीठ असलेल्या श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास गुरुवार 7 आँक्टोबरपासून आरंभ होणार आहे.
तत्पूर्वी बुधवार 29 सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस सुरुवात होणार आहे. याही वर्षी संसर्गजन्य करोनाच्या साथीचे संकट असल्याने श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर देवी भक्तांना बंद असल्याने भक्ताविना हा शारदीय नवराञ महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेनंतर गुरुवार 7 आँक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी मातेची मुख्य मुर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापणा करुन घटस्थापना करण्यात येणार आहे. हा शारदीय नवरात्र महोत्सव 7 आक्टोबर ते 21 आँक्टोबरपर्यत चालणार आहे. मात्र संसर्गजन्य करोनाचे साथीच्या रोगाचे सावट असल्याने श्री देवी भक्तांना प्रवेश मिळणार नाही. उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याने श्री देवीचे पुजारी व व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.