पुणे- नवरात्र महोत्सवानिमित्त पोलिसांनी देवीच्या प्रमुख मंदिरांसाठी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. बंदोबस्तासाठी होमगार्डचीही मदत घेण्यात येईल.
बंदोबस्तासाठी पोलीस दलातील 70 अधिकारी आणि 840 कर्मचारी बंदोबस्तात सहभागी हाणार आहे. यातील 24 अधिकारी आणि 110 कर्मचारी साध्या वेशात असतील. प्रमुख ठिकाणी गर्दी होणार नाही. याची काळजी घेण्याच्या सूचना स्थानिक पोलीस स्टेशन प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, विशेष बंदोबस्त पुरवण्यात आलेल्या मंदिरांमध्ये तांबडी जोगेश्वरी, भवानीमाता मंदिर, चतु:शृंगी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, तळजाई, पद्मावती, संतोषी माता, शितला देवी, जय भवानी माता मंदिर, वनदेवी मंदिर यांचा समावेश आहे. शिवाय, काही मंदिरांनी स्वतःची सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. यात प्रामुख्याने सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही अशी यंत्रणा असेल, असे पोलिसांनी सांगितले.