मुंबई – राज्यातील एसटी कामगार संपाला पाठिंबा म्हणून दोन जणांनी मंत्रालयाच्या समोर आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्येच हस्तक्षेप करीत दोन जणांसह चार महिलांनाहीं ताब्यात घेतले आहे.
हे लोक जनशक्ती पार्टी नावाच्या पक्षाशी संबंधीत आहेत असे सांगण्यात येते. त्यांनी रविवारी सकाळी अकराच्या सुमाराला मंत्रालयासमोरील रस्त्यावर जमून निदर्शने केली त्याचवेळी त्यांच्यातील दोन जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी स्वतावर रॉकेल ओतवून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. राज्यातील एसटी कामगारांवर सरकारकडून अन्याय होतो आहे सरकारकडे आमदारांचे पगार वाढवायला पैसे आहेत पण एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे कसे नाहीत असा सवाल या निदर्शकांनीं केला होता.