मुंबई – देशभरामध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे सध्या देशात आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. यंदा भारत देश आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे.
प्रजासत्ताक दिना निमीत्त श्री.विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास सुंदर अशी तिरंगा रंगाच्या फुलांची आरास करण्यात आली आहे.
श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पुण्याचे विठ्ठल भक्त सतीश आण्णा चव्हाण आणि पोफळे कुटुंबीया तर्फे ही फुलांची आरास करण्यात आली आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून विठ्ठल -रुक्मिणीला पारंपरिक पोशाख करून तिरंगा रंगाचे उपरणे घालण्यात आले आहे.
यासाठी गुलाब, जरबेरा, ब्लू डीजे, कामिनी, शेवंती, ऑर्केड, मिनीपाम, सॅंगोप, ड्रेसीना सायकस या वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय केळी, अननस, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब अशा विविध फळांची आणि पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली आहे.