सातारा – इन्स्टाग्रामद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊन हवाई दलातील अधिकाऱ्याला पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बारा तासांत रहिमतपूर येथून रामकुमार आईदानराम बिष्णोई, दिनेश मोहनलाल बिष्णोई (दोघे रा. हरिपूरा, ता.फलोदी, राजस्थान), लक्ष्मीलाल सरदारजी मीना (रा. उदयपूर, राजस्थान), निशू रामनिवास मीना (रा. गुना, राजस्थान) यांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार कमलेश गजानन स्वामी (रा. दत्तरामगड, जि. सीकर, राजस्थान) यांची व संशयित निशू हिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर पूजा गोस्वामी (वय 21, रा. पुणे) या नावाने बनावट खाते चालवत असलेल्या निशू हिने स्वामीला सातारा रेल्वे स्टेशन
या खुनाची घटना शनिवारी दुपारी तीन वाजता भरदिवसा घडल्याने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली होती. या संशयितांनी इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर मुलीच्या नावाने खाते उघडून पुण्यात राहण्यास असलेल्या अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याला साताऱ्यातील नटराज मंदिर परिसरात भेटण्यास बोलवून त्याचा गेम केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याबाबत पोलीस अधीक्षक बन्सल यांनी दिलेली माहिती अशी की, मृत अर्जुन याने दि. 13 मे 2020 रोजी वाईत गोळीबार केला होता. त्यामध्ये अभिजीत उर्फ भैय्या शिवाजी मोरे जखमी झाला होता. अर्जुन तेव्हापासून मोरे गॅंगच्या निशाण्यावर होता.
तसेच अर्जुनने त्याच्या वाढदिवसादिवशी भैय्याच्या घरासमोर फटाके वाजवले होते. तेव्हापासून चिडलेला भैय्या व अटकेतील तीन संशयित तरूण अर्जुनला गाठण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, अर्जुन तडीपारीनंतर पुणे येथे वास्तव्यास होता. त्यामुळे अर्जुन संशयितांच्या टप्प्यात येत नसल्याने त्यांनी त्याला साताऱ्यात बोलवण्याची नामी शक्कल लढवली. इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर एका तरूणीच्या नावाने खाते उघडण्यात आले. त्या खात्यावरून अर्जुनसोबत चॅटींग करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दि.2 रोजी साताऱ्यातील नटराज मंदिर परिसरात भेटण्यास बोलवण्यात आले. त्यानुसार अर्जुन त्याच्या एका मित्रासोबत पुण्यावरून साताऱ्यात आला व सोबतच्या मित्राला बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सोडून तो नटराज मंदिर परिसरात त्या आभासी प्रेयसीला भेटण्यासाठी गेला.
तिथे अगोदरच त्याच्यावर नेम धरून असलेल्या संशयितांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी अर्जुनच्या डोक्यात लागल्याने तो खाली कोसळल्यानंतर दुसऱ्या एका अल्पवयीन संशयिताने त्याच्या पोटात गोळी झाडून त्याचा काटा काढला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन अल्पवयीन तरूणांना पुण्यातून ताब्यात घेतले. बाकी संशयितांचा शोध घेतला जात असल्याची माहिती बन्सल यांनी दिली. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार संजय शिर्के, विजय कांबळे, आतिश घाडगे, विश्वनाथ संपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, सचिन ससाणे, विशाल पवार, रोहित निकम, मुनीर मुल्ला, प्रवीण कांबळे, प्रवीण पवार, विक्रम माने, स्वप्नील दौंड यांनी ही कामगिरी केली.