बारामती – बारामती एमआयडीसी येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतूने रविवार (दि.5)रोजी भारत फोर्ज ते सह्याद्री काऊ फार्मपर्यंत (15 किमी) गोदरेज ऍग्रोवेट लि आयोजित गोदरेज समृद्धी ट्री एथलॉन 2023 च्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष खुल्या गटात बारामती सायकल क्लबचा खेळाडू ओम सावळे पाटील याने 15 किलोमीटरचे अंतर 59 मिनिट व 11 सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला.
राज्यातील आठशे स्पर्धकांनी यात भाग घेतला. यावेळी कंपनीचे अधिकारी एस. वरदराज, विवेक रायझदा, दीपक कोळेकर, अभिमन्यू ढोले, ज्योतिराम चव्हाण, देवेंद्र राऊत, संपत सुंदर, ओंकार पोटे, संदीप मोरे, आबासाहेब भोईटे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक केसरकर, अग्निशमन अधिकारी महेश इंगवले व इतर मान्यवर उपस्थित होते.
दुसरा क्रमांक युवराज भोसले, तिसरा क्रमांक दादासो सत्रे यांनी मिळवला. 15 किलोमीटर महिला गटामध्ये प्रथम काजल गावडे, दीपाली जगताप, डॉ. नंदिता देवकाते व 5 किलोमीटर पुरुष गटात चंदन कुमार, अजित कुमार, सुजित कुमार यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. 5 किलोमीटर महिला गटात आरती कदम, मनीषा शिंदे व सोनाली ठवरे या विजेत्या ठरल्या.
पुरुष कर्मचारी 15 किमी गटामध्ये तुषार धोंडे, विबिशन पवार, पांडुरंग पवार तर 5 किमी पुरुष कर्मचारी गटात समाधान कातुरे, रोहन चांदगुडे व सूरज वाघ तर महिला कर्मचारी 5 किमी गटामध्ये अक्षदा शेंडगे, श्रद्धा कोडकर व प्रियांका खामगळ या विजेत्या ठरल्या.प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. आभार संदीप मोरे यांनी मानले.
रोपट्यांचे संवर्धन केल्यास मोफत नोंदणी
प्रत्येक खेळाडूंना शहर आणि घर, सोसायटी परिसरात वृक्षसंवर्धन रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. पुढीलवर्षी मोठे झालेल्या त्याच रोपट्याबरोबर सेल्फी घेऊन येणाऱ्यास मॅरेथॉनमध्ये मोफत नोंदणी केली जाणार असल्याचे गोदरेज ऍग्रोवेटच्या वतीने ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.