पुणे – मध्य रेल्वेने मागील आर्थिक वर्षापेक्षा यंदा आठ महिन्यांमध्ये 145 रॅकमधून ऑटोमोबाइलची वाहतूक केली. त्यापैकी पुणे विभागातून 53 रॅकची वाहतूक झाली.
लॉकडाऊनपासून रेल्वेकडून मालवाहतुकीवर भर देण्यात येत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत 118 रॅकची वाहतूक केली. त्यातुलनेत 2020 ते 21 या आर्थिक वर्षात मार्च ते नोव्हेंबरदरम्यान 145 रॅकमधून ऑटोमोबाइलची वाहतूक केली.
भारतातील विविध शहरांत कार, ट्रॅक्टर, व्हॅन, जीप आदी वाहनांची वाहतूक करण्यात आली. यामध्ये पुणे विभागातून 53, भुसावळ विभागातून 80, मुंबई विभागातील 3 आणि नागपूर विभागातूक 9 रॅकद्वारे वाहतूक केली.
पुणे विभागातील चिंचवड येथून एर्नाकुलम, बांग्लादेश या ठिकाणी वाहतूक करण्यात आली. यासाठी मध्य रेल्वेच्या पाच विभागांत बिझनेस डेव्हलपमेंट युनिटची स्थापना केल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.