परिवहन मंत्री अनिल परब यांचा पाय आणखी खोलात; ED कडून पुन्हा समन्स

मुंबई – शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा एकदा  ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. यानुसार  आता 28 सप्टेंबर रोजी अनिल परब यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

मात्र, ईडीच्या  चौकशीबाबत   अनिल परब यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने हा समन्स बजावला आहे.

दरम्यान,तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर  सचिन वाझे गृहविभागातील बदल्यांच्या संदर्भात  आरोप केला होता. तसेच वाझे यांनी दिलेल्या आपल्या कथित स्टेटमेंटमध्ये अनिल परब यांच्यावर आरोप करत म्हटलं होतं की, बदल्या थांबवण्यासाठी अनिल परब यांना 20 कोटी रुपये मिळाले होते. यावरूनच अनिल परब यांना ईडीने समन्स समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.