मुंबई – 2013 मध्ये ‘महाभारत’ पुन्हा एकदा नवीन दिग्दर्शक आणि स्टारकास्टसह टीव्हीवर प्रसारित झाला, सुरुवातीला सर्वांना वाटले की ही मालिका जुन्या ‘महाभारत’सारखी लोकप्रियता मिळवू शकणार नाही. पण प्रत्येक अभिनेत्याने आपल्या व्यक्तिरेखेला उत्तम निभावले. आणि या नव्या ‘महाभारत’लाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
View this post on Instagram
या ‘महाभारत’चा ‘शकुनी मामा’ही प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाला. त्याने आपल्या लूक आणि व्यक्तिरेखेने खूप लोकांचे मन जिंकले. आणि प्रेक्षक त्याच्या स्टाईलचे वेडे झाले. ‘शकुनी’च्या भूमिकेत दिसणारा अभिनेता प्रणित भट याने काही काळापूर्वी त्याचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये प्रणित भटच ट्रांसफॉर्मेशन पाहायला मिळते आहे. या ताज्या फोटोंमध्ये प्रणितला ओळखणे फार कठीण आहे. प्रणित भटने सुरुवातीला मॉडेलिंगसुद्धा केली आहे.
View this post on Instagram
2004 मध्ये प्रणितने टेलिव्हिजनच्या जगात प्रवेश केला. ‘इस्शाह कोई है’, काजल’ आणि ‘कितनी मस्त है जिंदगी’ यांसारख्या मालिकांमध्ये तो दिसला, पण या मालिकांमधून तो विशेष ओळख निर्माण करू शकला नाही. ‘महाभारत’ने त्याचा करिअरमध्ये टर्निग पॉईंट ठरले. ‘महाभारत’ व्यतिरिक्त तो ‘बाल शिव’, ‘पोरस’, ‘रजिया सुलतान’, ‘अलाद्दीन’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसला आहे.