वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील लोणावळा व तळेगा नगरपरिषदेसह वडगाव मावळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नगरविकास विभागाच्या वतीने याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. या रिक्त जागी बदली होऊन येणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर विकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने राज्यातील ब गट संवर्गातील 68 मुख्याधिकाऱ्यांना अ गटात पदोन्नती देत, त्यांच्या अन्यत्र बदल्या केल्या आहेत.
लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ भगवान जाधव यांची औरंगाबाद महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याजागी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत खंडू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश गणपत दिघे यांची मालेगाव महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक़्ढती करण्यात आली आहे. त्यांच्याजागी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वडगाव मावळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर-बोराडे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. त्यांची बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.
वडगाव नगरपंचायत अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत
राज्यभरातील झालेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये वडगाव मावळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर-बोराडे यांची बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषदांना नवीन मुख्याधिकारी लाभले आहेत. मात्र, वडगाव नगरपंचायतीकरिता नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे.
4) नानासाहेब देवराम कामठे, मुख्याधिकारी चाकण ते उपायुक्त वसई-विरार मनपा.
5) मच्छिंद्र मारूती घोलप – मुख्याधिकारी जुन्नर न.प. ते उपायुक्त सोलापूर मनपा.
6) सुहास परशुराम जगताप – सहाय्यक आयुक्त पुणे मनपा ते उपायुक्त मालेगाव मनपा,
7) संजीव नि. ओहोळ – सहाय्यक आयुक्त पुणे मनपा ते उपायुक्त सांगली-मिरज – कुपवाड मनपा.
8) प्रज्ञा शंकरराव पोतदार सहाय्यक आयुक्त पुणे मनपा ते सहाय्यक आयुक्त नागपूर मनपा.