मुंबई – उर्फी जावेदसाठी तिच्या फॅशनमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे ही काही नवीन गोष्ट नाही. फॅशन सेन्सेशन बनलेली उर्फी नेहमीच तिच्या रंगीबेरंगी आणि अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या हटके लूक मधील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
आणि त्यामुळेच अनेकदा ती नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील होत असते. नुकतंच उर्फीचा नवीन लूक समोर आला असून, यामध्ये तिने चक्क टोमॅटोचे कानातले घातले आहेत. सध्या टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे भारतातील प्रत्येक सामान्य माणूस चिंतेत असताना, उर्फीने मात्र टोमॅटोचा वापर ईअररिंग्स म्हणून केला आहे.
सध्या तिचा हा सगळीकडे व्हायरल होता असून, नेटकरी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करत असताना उर्फीने “टोमॅटो आता नवीन सोनं आहे..” असं देखील म्हंटलं आहे. यामध्ये उर्फीने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि वन साइट क्रॉप टॉप परिधान केला आहे.
तसेच ते टोमॅटो खातानाही दिसत आहे. हाय बन आणि न्यूड मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. पण या सगळ्यात भाव खाऊन गेलेत ते उर्फीचे कानातले. तिच्या या टोमॅटो पासून तयार केलेल्या ईअररिंग्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.