टोकियो : ऑलिम्पिक तयारीला पुन्हा वेग

नूतनीकरण व सुविधांची लवकरच पूर्तता होणार

टोकियो – करोनाचा धोका काहीसा कमी झाल्याने आता आगामी वर्षात जपानमध्ये होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीला पुन्हा एकदा वेग आला आहे. करोडो डॉलर्सचा खर्च यापूर्वीच झालेला असताना पुन्हा एकदा जपान सरकारने या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

मार्चपासून जगभरात करोनाचा धोका वाढू लागल्याने ही स्पर्धा एक वर्ष पुढे ठकलण्यात आली होती. त्यानंतर या स्पर्धेच्या नव्या वेळापत्रकाला मंजुरी देण्यात आली. ही स्पर्धा मूळ कार्यक्रमानुसार 24 जुलै ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत होणार होती. आता नव्या वेळापत्रकानूसार ही स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे.

या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतर जपान सरकार व जपान ऑलिम्पिक संघटना यांनी करोडो डॉलर्स खर्च करून देशातील सर्व सुविधांची निर्मिती व नूतनीकरण केले होते. स्पर्धा पुढे ढकलली गेल्यामुळे आयोजकांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यानंतर ही स्पर्धा पुढील वर्षी होणार हे निश्‍चित झाल्यावर पुन्हा एकदा

स्पर्धेच्या तयारीला वेग आल्याचे दिसत आहे. आता त्यासाठी सरकार व संघटना यांनी एकत्रीतरीत्या निधी उपलब्ध करून दिला असून पुन्हा एकदा स्पर्धेच्या आयोजनावर करोडो डॉलर्स खर्च केले जाणार आहेत.करोनावरील लस उपलब्ध झाल्यावर प्रथम खेळाडूंना तसेच त्या संबंधित व्यक्तींना दिली जाणार आहे. तसेच स्पर्धेसाठी जगभरातून जपानमध्ये येत असलेल्या विविध देशांच्या खेळाडूंनादेखील ही लस दिली जाणार आहे. त्याच बरोबर स्पर्धेपूर्वी व दरम्यान सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफशी संबंधित व्यक्तींची करोना चाचणी करण्यात येणार आहे, असेही संघटनेने सांगितले आहे.

जपान सज्ज

ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकसाठी जपानमध्ये जवळपास 16 हजार खेळाडू तसेच 10 हजारांपेक्षा जास्त प्रशिक्षक, पदाधिकारी, पंच, अतिथी, प्रायोजक, माध्यम प्रतिनिधी तसेच सपोर्ट स्टाफमधील व्यक्ती दाखल होणमार आहेत. या सर्वांची योग्य व्यवस्था तसेच करोना चाचणी व सर्व सुविधांची उपलब्धता यांसाठी जपान सज्ज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.