आजचे भविष्य (रविवार, 20 जून 2021)

मेष : सर्वांच्या कौतुकास पात्र असे काम हातून घडेल. महिलांची अध्यात्मात प्रगती होईल. धनलाभाची शक्‍यता.

वृषभ : या सप्ताहात उत्साह वाढता राहील. व्यवसायात विस्ताराचे बेत घोळतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिकीकरण कराल. नोकरदार व्यक्‍तींना नवीन अनुभव येतील.

कर्क : वरिष्ठांच्या विक्षिप्त व चमत्कारिक स्वभावामुळे त्रास संभवतो. व्यवसायात यांत्रिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : घरात आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीगाठीमुळे आनंद मिळेल. महिलांना वैवाहिक सुख चांगले मिळेल.

कन्या : व्यवसायात खेळत्या भांडवलाची आवश्‍यकता लाभेल. त्यासाठी बॅंका व हितचिंतकांची मदत घ्याल.

तूळ : कामात बिनचूक राहून कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवहारचातुर्याने काही क्षेत्रात यश मिळवाल.

वृश्‍चिक : नोकरीत कामाचा बोजा वाढेल. दगदग धावपळ कराल. जादा कामातून पैसे मिळवता येतील.

धनू : महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. खर्चावर नियंत्रण ठेवावे. तरुणांनी व्यसनांपासून कटाक्षाने दूर राहावे.

मकर : अनुकूलता लाभल्याने कामातील आत्मविश्‍वास बळावेल. सूचक स्वप्ने पडतील. विद्यार्थ्यांनी नाचरेपणा करू नये.

कुंभ : नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.

मीन : महिलांचा वेळ गृहसजावट व गृहखरेदीत जाईल. नवविवाहितांना अपत्यसुखाची चाहूल लागेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.