मेष : वरिष्ठ एखाद्या कामाची महत्त्वाची जबाबदारी सोपवतील. त्यामुळे जादा काम करणे भाग पडेल.
वृषभ : कामाची विस्कटलेली घडी नीट बसवून कामे पूर्ण कराल. घरात वातावरण चांगले राहील.
मिथुन : कार्य तत्पर राहून कामात पुढाकार घ्याल. व्यवसायात चोखंदळ राहून कृतीवर भर द्याल.
कर्क : नवीन कामेही ओळखीतून मिळतील. नोकरीत तुमच्या गुणांना वाव देणारे काम मिळेल.
सिंह : व्यवसायात परिस्थितीनुसार ध्येय धोरणे ठरवाल. कृतीवर भर जास्त असेल. कष्टाचीही तयारी राहील.
कन्या : नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक धोरण अवलंबाल. तणावमुक्त झाल्याने हायसे वाटेल.
तूळ : व्यवसायात टिकून राहण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब कराल. महिलांनी तब्येत सांभाळा.
वृश्चिक : व्यवसायात उलाढाल वाढवण्याचा विशेष प्रयत्न राहील. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क होईल.
धनु : व्यवसायात वेगवेगळया स्तरांवर आपली छबी उमटवण्याचा तुमचा प्रयत्न राहील.
मकर : नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळणारी संधी मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील.
कुंभ : व्यवसायात आर्थिक स्थिती नियंत्रणात आणण्याचा तुमचा विचार सफल होईल.
मीन : व्यवसायात दैनंदिन कार्यक्रमात फेरबदल कराल. पैशाची बाजू विशेष बळकट करण्याचा प्रयत्न राहील.