दक्षिणात्य सिनेमांमध्ये आपली जबरदस्त छबी असलेल्या धनुषने आता थेट हॉलीवूडमध्ये उडी मारली आहे. नेटफ्लिक्सच्या “द ग्रे मेन’मध्ये रायन गॉसलिंग आणि ख्रिस इवान्ससारख्या बड्या कलाकारांबरोबर धनुष दिसणार आहे. अँथनी आणि जो रूसो हे या सिनेमाचे डायरेक्शन करणार आहेत. मार्क ग्रीनीने लिहीलेल्या कादंबरीवर हा सिनेमा आधारलेला आहे. सीआयएचे माजी ऑपरेटिव्ह कोर्ट जेंट्रीवर ही कथा आधारलेली असेल.
स्वतः धनुषने ट्विटरवरच्या पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सला जेम्स बॉन्डसारख्या मोठ्या आणि भव्य फ्रॅन्चायझी विकसित करायची आहे. त्याचाच भाग ‘द ग्रे मेन’ असणार आहे. या सिनेमासाठी 200 मिलीयन डॉलरचे बजेट निश्चित केले गेले आहे. धनुषच्या दक्षिणात्य फॅन्ससाठी ही गोष्ट खूपच आनंददायी असणार आहे.
धनुषची दक्षिणात्य ऍक्शन आणि डायलॉग डिलीव्हरी हॉलिवूडमध्येही लोकप्रिय करण्याचा हा चांगला मार्ग असेल. कदाचित त्याच्या रांगडेपणाची हॉलीवूडवासियांनाही भुरळ पडली असेल. काहीही असो पण धनुष हॉलिवूडमध्ये गेला तर तो दक्षिणेपेक्षाही मोठा स्टार होणार हे निश्चित आहे. त्याच्या ‘द ग्रे मेन’बाबतच अधिक तपशील लवकरच येईल, मग धनुषचा रोल किती मोठा आहे, हे समजेल.