मेष : तुमचे मनोधैर्य चांगले असल्याने अडथळ्यांवर मात कराल. नोकरीत तुमच्या कौशल्याला पुरेपूर वाव मिळेल.
वृषभ : व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी काही ठोस पावले उचलाल. त्याचा फायदा तुम्हाला होईल.
मिथुन : नोकरीत कामे स्वीकारताना स्वतःची पात्रता ओळखून पुढे जा. नोकरदारांना कामानिमित्ताने प्रवास संभवतो.
कर्क : कलावंतांना प्रसिद्धीचे योग येतील. कवी साहित्यिकांच्या हातून उत्तम लेखन होईल.
सिंह : महिलांनी सभोवतालच्या व्यक्तींशी होणारे वादविवादाचे प्रसंग टाळावेत. अनपेक्षित लाभ होतील.
कन्या : विद्यार्थ्यांपुढे भविष्याबाबत कोडे निर्माण होण्याची शक्यता आहे. भावंडांचे सुख उत्तम मिळेल.
तूळ : कामाचे वेळी काम व इतर वेळी आराम असे धोरण असेल. महिलांचा वेळ घरसजावटीमध्ये जाईल.
वृश्चिक : आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. व्यवसायात उधारी वसुलीकडे लक्ष केंद्रित करा.
धनू : पैसा चांगला मिळेल. परंतु खर्चही तसाच असेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्वासने ते पाळतील.
मकर : महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील.
कुंभ : कौटुंबिक सौख्य उत्तम मिळेल. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग. बेरोजगारांना काम मिळेल.
मीन : कर्तव्याला प्राधान्य देऊन अवघड कामे मार्गी लावाल. व्यवसायात स्वतःचे वेगळेपण सिद्ध कराल.