मेष : नोकरीत कामात फेरबदल होतील. आडमुठे धोरण बाजूला ठेवून सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागावे लागेल.
वृषभ : घरात तुम्ही तुमचे कौशल्य दाखवा. मोठ्या खर्चाचा बोजा तुमचेवर येईल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल.
मिथुन : महिलांनी वैचारिक देवाणघेवाण केली तर बरेच प्रश्न सुकर होतील. विद्यार्थ्यांनी मनोनिग्रह करावा.
कर्क : अनपेक्षित काही कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडले जातील.
सिंह : खर्चावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्याच प्रमाणात यश येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील.
कन्या : जादा सुखसुविधा मिळतील. जुन्या हितसंबंधांना उजाळा मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील.
तूळ : घरात छोटा समारंभ ठरेल. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल. नवीन जागा, वास्तू, वाहन खरेदीचे योग.
वृश्चिक : प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. तरुणांनी अतिविश्वास / अंधविश्वास ठेवू नये. घरगुती कार्यक्रम होतील.
धनू : आर्थिक उन्नती झाल्याने कार्यक्षमता वाढेल. नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामातून पैसे मिळतील.
मकर : नोकरीत “”ऐकावे जनाचे करावे मनाचे” हे धोरण ठेवा. बेकारांना कामाची सुसंधी मिळेल.
कुंभ : शेअर्सच्या व्यवहारात फायदा संभवतो. महिलांना कौटुंबिक जीवनात सहजीवनाचा आनंद मिळेल.
मीन : ग्रहमान अनुकूल असल्याने आर्थिकदृष्ट्या विशेष लाभ होईल. व्यवसायात विस्ताराचे बेत साकार होतील.