नगर -लॉकडाऊन काळात महावितरणचे कर्मचारी सर्वत्र सुरळीत व विनाखंडित वीज पुरवठा होण्यासाठी आपली जवाबदारी चोख बजावत आहेत. महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना करोना पासून वाचविण्यासाठी व त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने मोफत होमिओपॅथी उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 216 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शिबिरात सहभाग घेतला.
नुकत्याच झालेल्या कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरण मधील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. साईनाथ चिंता, डॉ. संकेत लांडे, व डॉ. श्रद्धा गांधी यांच्या सहकार्यतून मोफत होमिओपॅथी उपचार शिबीरत तपासणी करून त्यांची प्रतिकारशक्ती वाढवणारे औषधे मोफत देण्यात आले. या शिबिरासाठी शहर उपविभागातील 216 अधिकारी व कर्मचारी यांना टप्याटप्याने बोलवून सोशल डीस्टंसिंगचे सर्व नियम पळण्यात आले.
शिबीरचे आयोजन महावितरणचे उपव्यवस्थापक व पद्मशाली युवा शक्तीचे पदाधिकारी अजय म्याना, सुमित इपलपेल्ली, योगेश म्याकल, सागर बोगा, दीपक गुंडू, श्रीनिवास इपलपेल्ली, आनंद गुंटूक, सतीश चिंता यांनी केले. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भराडे, उपकार्यकारी अभियंता कोपनर आदी उपस्थित होते.