मुंबई – बॉलिवूडमधील अनेक कलाकार यशस्वी झाले की हॉलीवूडचा रस्ता धरतात. आपण एकदा तरी हॉलिवूड चित्रपट करावा असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या टायगर श्रॉफने स्पायडर मॅनसाठी ऑडिशन दिल्याचा खुलासा नुकताच केला आहे. एवढेच नाही तर याविषयी बोलताना अभिनेत्याने असेही सांगितले की, त्याने या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते आणि ऑडिशनची टेपही मार्वलला पाठवली होती.
टायगर श्रॉफ बॉलिवूडचा स्टंटमॅन म्हणून ओळखला जातो. त्याचे जबरदस्त स्टंट्स आणि डान्स मूव्ह्स पाहून अनेकांना घाम फुटतो. टायगर श्रॉफने अलीकडेच एका कॅनेडियन एफएमला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की त्याने एकदा स्पायडर-मॅनसाठी ऑडिशन दिले होते. त्याने निर्मात्यांना सांगितले की मी VFX वरील तुमचे खूप पैसे वाचवू शकतो,कारण स्पायडर मॅन त्याच्या चित्रपटात जे करतो ते मी स्वतः करू शकतो. 2017 च्या स्पायडर-मॅन: फॉर फ्रॉम होमच्या हिंदी डबमध्ये टायगरने स्पायडर-मॅनच्या पात्राला आवाज दिला होता.
Tobey Maguire, Andrew Garfield आणि Tom Holland यांनी तीन वेगवेगळ्या चित्रपट मालिकांमध्ये स्पायडर-मॅनचे पात्र साकारले आहे. गेल्या वर्षीच्या स्पायडर मॅन: नो वे होम या चित्रपटात हे तिघे एकत्र दिसले होते. मार्वल कॉमिक्समध्ये स्पायडर-मॅनचा एक भारतीय भाग देखील आहे परंतु आतापर्यंत कोणत्याही भारतीय अभिनेत्याने मोठ्या पडद्यावर त्याची भूमिका केलेली नाही.