नगर -अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यास्पर्धेत आठ तालुक्यातील 85 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावरिष्ठ मानांकन गटात सुयोग वाघ तर कनिष्ठ गटात प्रज्ज्वल आव्हाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तिसऱ्या ऑनलाईन बुध्दीबळ स्पर्धेत 6 वर्ष ते 78 वर्षा पर्यंतच्या खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. तीन मिनिटे प्रत्येक खेळाडूला मिळत असल्याने अचूक चाली वेळेत खेळाव्या लागतात. एकूणच सहा मिनिटे हा डाव चालत असल्याने बुद्धिबळाच्या 64 घरावर लक्ष ठेवून आपल्या व प्रतिस्पर्ध्याच्या 32 मोहऱ्यानंकडे खेळाडूंची कसब लागते. या स्पर्धत विजेत्या खेळाडूंसाठी रोख बक्षीस देण्यात आले.