नवी दिल्ली – केंद्रासरकारच्या महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना आहेत ज्याचा आपण चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला केंद्रसरकारकडून आर्थिक साहाय्य प्राप्त होत असते. अशाच एका योजनेबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही महिलांसाठीची महत्वाची योजना आहे.
गर्भवती आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही योजना आहे. महिलांचे आरोग्य सुधारून त्यांच्यातील कुपोषण दूर करणे, त्यांना योग्य उपचार आणि औषधांचा खर्च देणे हा आहे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे प्रेग्नंट आणि स्तनदा मातांना 5000 रूपयांची रक्कम मिळते.
ही महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजना आहे. हे 5000 रूपये तीन हप्त्यात महा डीबीटी पोर्टलद्वारे महिलांच्या खात्यात जमा केले जातात. प्रेग्नंट महिलांना या योजनेत रजिस्ट्रेशन करताना 1000 रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. सहाव्या महिन्यात किमान एका तपासणीनंतर 2000 रूपयांचा दुसरा हप्ता मिळतो. तर तिसरा हप्ता बाळाच्या जन्मानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर 2000 रूपयांचा दिला जातो.